विनापरवाना खुदाईबाबत पाचपट दंडाची कारवाई

 
20151214_213947-BlendCollageकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता खुदाई केलेबाबत हॉटेल अनुग्रहाचे मालक जयकुमार व विजयकुमार शेट्टी यांना नुकसान भरपाई रक्कमेच्या पाच पट दंड आकारणी करणेचे आदेश आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिले.
न्यु शाहूपुरी येथील सि.स.नं.323 अ हॉटेल अनुग्रह या मिळकतीचे चेंबरपासून रस्तेचे बाजूस 5.0 मीटर रस्तेची खुदाई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता करत असलेचे आयुक्त पी.शिवशंकर यांच्या निदर्शनास आले होते. यावेळी आयुक्तांनी ताराराणी विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता यांना चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार चौकशीअंती करणेत आलेली खुदाई ही महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेचे आढळले होते व तसा अहवाल उपशहर अभियंता यांनी आयुक्तांना सादर केला होता. त्यावर आयुक्तांनी संबधीताना नुकसान भरपाई रक्कमेच्या पाच पटीने दंड (रु.71,475/-) आकारणी करुन दंड वसुल करणेचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!