
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातील संशोधक विद्यार्थी रणजीत पापा माने यांना सामाजिक शास्त्रे विद्याशाखेअंतर्गत इतिहास विषयात पीएच.डी. जाहीर करण्यात आली.
माने यांनी ‘दक्षिणी संस्थानांतील प्रजापक्षीय चळवळीच्या नेतृत्वाचा अभ्यास (१९२१ ते १९४९)’ या विषयावरील शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला. त्यांना इतिहास अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ. पद्मजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनासाठी माने यांना नवी दिल्ली येथील भारत इतिहास संशोधन परिषदेची (आय.सी.एच.आर.) शिष्यवृत्ती मिळाली.
Leave a Reply