
कोल्हापूर: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सेमीफायनल ठरलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. कोल्हापूरकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी तीनपर्यंत 50 टक्के मतदान झालं आहे. तर कल्याण-डोंबिवलीत दुपारी दीड वाजेपर्यंत 28 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सुरुवातीच्या सत्रात कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवलीत मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांनीही सकाळच्या वेळी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही ठिकाणी संध्याकाळी साडे पाचपर्यंत मतदान करता येणार आहे.
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपमध्ये खुली लढत होत आहे तर कोल्हापुरातही भाजप-ताराराणी आघाडी एकत्र तर शिवसेना स्वबळावर आखाड्यात आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देतो आणि दोन्ही पालिकांवर कोणाची सत्ता येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
Leave a Reply