मुंबई: ज्येष
्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं.त्या 80 वर्षांच्या होत्या. मराठी रंगभूमीवरील तेजस्वी काळाच्या साक्षीदार असलेल्या सुलभाताईंच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं अपरिमित नुकसान झालंय. गेला काही काळ त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. मात्र या आजारासोबत त्यांची सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उद्या संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘वाडा चिरेबंदी’ यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यासोबतच मराठीत त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचं मोठं नुकसान झालंय. ‘घर हो तो ऐसा…’,’इजाझत’, ‘भूमिका’, ‘वीरासत’, ‘इंग्लिश विंग्लिश’ अशा हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं होतं.
तर मराठीत ‘जैत रे जैत’, ‘विहीर’, ‘हापूस’, ‘इन्व्हेस्टमेंट’ यासारख्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारलीये.

Leave a Reply