भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करणार: बराक ओबामा

 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या समर्थनामुळे भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाला नियंत्रण करणाऱ्या संस्थेच्या (MTCR) सदस्यत्वाचा IMG_20160609_083055मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप (NSG) अर्थात आण्विक पुरवठा करणाऱ्या देशांची यादीत भारताचा समावेश निश्चित मानला जात

एनएसजीमध्ये 34 सदस्य देश असून भारताच्या सहभागाबद्दल अमेरिकेचा पाठिंबा आहे. दुसरीकडे चीन मात्र पाकिस्तानचं समर्थन करत असल्याचं म्हटलं जातं. विएन्नामध्ये 9 जून रोजी होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णयाची अपेक्षा आहे

भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक व्यापक आणि दृढ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितलं. दोन्ही देशातले आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी ओबामांशी बातचित केल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!