कोल्हापूर : जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना बँकांमार्फत 2688 कोटी रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने कोल्हापूर जिल्ह्यास दिले असून पीक कर्ज वाटपापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व बँकांनी आणि शासकीय यंत्रणांनी कृती कार्यक्रम निश्चित करुन पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलताने दिले.
जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस रिझर्व बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक पी.एस.पराटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी.के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँेकेचे जिल्हा ÃÖ´Ö¾ÖµÖकú आणि अन्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यंदा 80 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्राधान्य क्रमाचा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जिल्ह्यात हा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्यात येईल यासाठी सुलभ पीक कर्ज वाटप अभियान हाती घेण्यात येत आहे. पीक कर्ज वाटपापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँका आणि यंत्रणांनी घ्यावी. या योजनेत कोणत्याही बँकेने कर्ज पुरवठा केलेला नाही असे बिगर कर्जदार शेतकरी पीक कर्जास पात्र ठरविण्यात आले आहे. 1 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर बोजा नोंदविण्यात येणार नाही. 50 हजार पर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना इतर बँकाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदा पीक कर्ज वापटपासाठी शासनाने 2688 कोटीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिले असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1344 कोटी इतके उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेस देण्यात आले आहे. उर्वरित उद्दिष्ट राष्ट्रीय कृत, व्यापारी आणि खाजगी तसेच ग्रामीण बँकांना देण्यात आले आहे. हे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकांनी शासनाच्या या प्राधान्य कार्यक्रमास टॉप प्रॉयोरेटी देऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा यासाठी थोडा अधिक वेळ देण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.

Leave a Reply