
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे राजाभाडे थकबाकीबाबत जनता बाजार सीलरामपूरी व वरूणतीर्थवेश येथील जागा जनता सेंट्रल को.ऑफ कंझ्युमर्स स्टोअर्स यांचे मागील झाले मुदतवाढीप्रमाणे होणारे भाडे यापैकी राजारामपूरी येथील रू. 10409701/- व वरूणतीर्थवेश येथील रू. 4341253/- इतकी रक्कम थकीत होती. याबाबत आयुक्त यांनी 81 ब नुसार कब्जा काढून घेणेबाबत नोटीस बजावून त्यानंतर सुनावणी आदेश लागू करून त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे 81 ब नुसार जनता बझार यांचे राजारामपूरी व वरूणतीर्थवेश येथील इमारतीस सील करून सदरचे इमारतीचा आज कब्जा घेतला.
सदरची कारवाई आयुक्त पी.शिवशंकर यांचे आदेशाने उप-आयुक्त विजय खोराटे यांचे मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, नितीन चौगले, शेखर साळोखे, गणेश नारायणकर, अमर येडेकर, संदीप घाटगे, शाम कराळे, प्रदीप भोसले यांनी कामगिरी पार पाडली.
Leave a Reply