कुलगुरुंनी मांडला एक वर्षाचा लेखाजोखा

 
IMG-20160616-WA0015कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी कुलगुरू पदाच्या कारकीर्दीस उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या पूर्वसंध्येला मा. कुलगुरू यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्षभरातील वाटचालीचा लेखाजोखा सादर केला. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठासारख्या महान परंपरा लाभलेल्या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी दिल्याबद्दल मा. राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांचे मनःपूर्वक आभार मानले. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध अधिकार मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, यांच्यासह आपल्या मातोश्री, पत्नी आणि कुटुंबियांचेही मनापासून आभार मानले.

या पत्रकार परिषदेस बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्ती कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, आयक्यूएसी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड, डॉ. जी.एस. कुलकर्णी, दूरशिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. एन.पी. सोनजे, डॉ. ए.के. साहू, डॉ. एच.एन. मोरे, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. बी.जी. कोळेकर, डॉ. ए.व्ही. घुले आदी उपस्थित 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!