
कोल्हापूर : पूणे येथील समुचीत अधिकारी वर्गाच्या जाचक व अवैध कारवाईमुळे डॉ.जपे यांचे क्लिनिक व तीन सोनोग्राफी मशीन गेले २ महीने बंद आहेत.त्या कारवाईच्या निषेर्धात राज्यातील सर्व सोनोग्राफी व रेडीओलॉजीस्टनी १४ जून रोजी एकदिवसीय बंद ठेवला होता. सरकार व अधिकारी वर्गातर्फे काहीच कारवाई न झाल्याच्या निषेर्धात रोजी हा बेमुदत राज्यव्यापी बंद पूकारण्यात आलेला आहे. संघटनेच्या मागण्यांमध्ये PCPNDT ACT मधील जाचक व काही चुकीच्या कलमामध्ये बदल व्हावा ही महत्वाची मागणी आहे. या राज्यव्यापी बंदला जर का काही प्रतिसाद मिळाला नाही तर देशव्यापी बंदसुध्दा करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे उद्या मुंबई येथील आझाद मैदानावर हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. स्त्रीरोग तज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशन व नर्सिंग होम ओनर्स असोसिएशन यांनी सुध्दा या संपास पाठींबा जाहीर केला आहे. बंद काळामध्ये रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे रुग्णांची सोय सरकारी हॉस्पीटल मध्ये केली जावी अश्या विनंतीचे पत्र प्रभारी शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख यांना देण्यात आले आहे.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाळकृष्ण कित्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुलींच्या जन्मप्रमाणातवाढ व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही पण जो बदल झाला आहे तो डॉक्टरांमुळे हे मान्य करायला हवेच.F फॉर्म म्हणजेच ना गर्भपात फॉर्म भरून लोक कायद्याचे पालन करतात.पण त्या फॉर्म मध्ये काही त्रुटी अनवधानाने राहिल्या तर त्याची पुनर्रपडताळणी न करता सोनोग्राफी मशीन सील करणे,संबंधित डॉक्टर यांचा व्यवसाय बंद करण्यासाठी शिफारस करणे अश्याप्रकारचा कारवाईचा बडगा उगारला जातो.फॉर्म मधील त्रुटी म्हणजे गर्भ चिकित्सा कायद्याचा भंग असा या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा समज झालेला आहे. याच मागण्यांसाठी हा बंद पुकारलेला आहे असे,सचिव डॉ.पृथ्वीराज जाधव यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस डॉ.सचिन पाटील,डॉ.कुबेर,डॉ.वाधवानी,डॉ.निरंजन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व रेडीआोलॉजिस्ट उपस्थित होते.
Leave a Reply