मोफत योग शिबीर पुढील वर्षभर राबविण्याची कुलगुरूंची घोषणा

 
IMG_20160621_161947कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर  श्री क्षेत्र सिध्दगिरी मठकणेरी यांचेसंयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबीराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबालवृद्धांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जूनजागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पार पडला. पहिल्याआंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१जून२०१५ पासून आजपर्यंत योगशक्ती –योगयज्ञअंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षणकार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमास दैनंदिन २००हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबीर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.
यावेळी कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचेश्री काडसिद्धेश्वर स्वामीप्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदेविद्यार्थी कल्याण विभागाचेसंचालक डॉ. डी.के. गायकवाडक्रीडाविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातीलशिक्षक, अधिकारी  सेवक उपस्थित होते.प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली.
यापुढील काळातही साधकांनी दररोज सकाळी ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिराचा उत्तम आरोग्यासाठी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे तसेचश्री काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!