
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शहरात सरासरी ६८.८० टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ८१ प्रभागांसाठी ५०६ उमेदवार रिंगणात होते. यांच्यासाठी एकूण ४ लाख ५३ हजार २१० मतदारांपैकी ३ लाख ११ हजार ९१५ मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. उद्या सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असून २ वाजेपर्यत संपूर्ण प्रभागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी तीन वाजेपर्यंत 5२ टक्के मतदान झाले. तर चार वाजेपर्यत ६२ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वच प्रभागातील उमेदवार मतदारास मतदान केंद्रापर्यंत आणण्यास यशस्वी ठरले.
Leave a Reply