
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजप ताराराणी आघाडी आणि शिवसेनेला मागे टाकत कॉंग्रेसने तब्बल २७ जागांवर निर्विवाद विजय मिळविला. आजचा निकाल हा त्यामुळे धक्कादायक ठरला. भाजपला १३ तर महायुतीला १९ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीनेही बाजी मारत १५ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे कालपर्यंत त्रिशंकू सभागृहाचा अंदाज होता पण आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच आघाडीची सत्ता येणार असे म्हणायला हरकत नाही. राष्ट्रवादी यासाठी तयार असल्याचे सुत्रांच्याकडून समजते. राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी भाजप आणि ताराराणी आघाडीचा प्रभाव कोल्हापूर महापालिकेवर दिसला नाही.
याउलट माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना अनेक पराभवानंतर यशाची चव चाखायला मिळाली. यात महापालिकेवर भगवा फडकवणारच अशा घोषणा देणाऱ्या शिवसेनेला मात्र लोकांनी नाकारलेले दिसून आले. त्यांना फक्त चारच जागांच्यावर विजय मिळवता आला. आताच्या निकालामध्ये प्रस्थापितांना पराभव स्वीकारावा लागला तर मागील निवडणुकीत पराभूत झालेल्यांचा या निवडणुकीत विजय झाला. दिग्गज उमेदवार असणारे सुनील मोदी, राजू लाटकर, चंद्रकांत बनछोडे, माजी महापौर जयश्री सोनवणे, नंदकुमार वळंजू, हरिदास सोनावणे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. कही ख़ुशी कही गम अशी परिस्थिती या निकालामुळे आज पहायला मिळाली. महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे :
- शुगरमिल – सुभाष बुचडे (कॉंग्रेस)
- कसबा बावडा – फडतरे संभाजी (कॉंग्रेस)
- कसबा बावडा हनुमान तलाव – संदीप नेजदार (कॉंग्रेस)
- कसबा बावडा पॅव्हलीयन – माधुरी लाड (कॉंग्रेस)
- लक्ष्मीविलास पॅलेस – अशोक जाधव (कॉंग्रेस)
- पोलीस लाईन – स्वाती यवलुजे (कॉंग्रेस)
- सर्किट हाउस – अर्चना पागर (ताराराणी आघाडी)
- भोसलेवाडी कदमवाडी – सत्यजित कदम (ताराराणी आघाडी)
- कदमवाडी – कविता माने (ताराराणी आघाडी)
- शाहू कॉलेज – सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी)
- ताराबाई पार्क – निलेश देसाई (ताराराणी आघाडी)
- नागाळा पार्क – अर्जुन माने (कॉंग्रेस)
- रमणमाळा – राजराम गायकवाड (ताराराणी आघाडी)
- व्हीनस कॉर्नर – राहुल चव्हाण (शिवसेना)
- कनानगर – दिलीप पोवार (कॉंग्रेस)
- शिवाजी पार्क – आशिष ढवळे – (भाजप)
- सदर बाजार – स्मिता माने – (ताराराणी आघाडी)
- महाडिक वसाहत – सीमा कदम (ताराराणी आघाडी)
- मुक्त सैनिक वसाहत – राजसिंह शेळके (ताराराणी आघाडी)
- शाहू मार्केट यार्ड – सुरेखा शहा (कॉंग्रेस)
- टेंबलाईवाडी – कमलाकर भोपळे (ताराराणी आघाडी)
- विक्रम नगर – शोभा कवाळे – (कॉंग्रेस)
- रुईकर कॉलनी – उमा इंगळे (भाजप)
- साईक्स एक्सटेनशन – संजय मोहिते (कॉंग्रेस)
- शाहूपुरी तालीम – पूजा नाईकनवरे (ताराराणी आघाडी)
- कॉमर्स कॉलेज – निलोफर आजरेकर (अपक्ष)
- ट्रेजरी ऑफिस – मेह्जबीन सुभेदार (ताराराणी आघाडी)
- सिद्धार्थ नगर – अफजल पिरजादे (राष्ट्रवादी)
- शिपुगडे तालीम – सरिता मोरे (राष्ट्रवादी)
- खोलखंडोबा – किरण शिराळे (ताराराणी आघाडी)
- बाजार गेट – उमा बनछोडे (कॉंग्रेस)
- बिंदू चौक – ईश्वर परमार (ताराराणी आघाडी)
- महालक्ष्मी मंदिर – हसीना फरास (राष्ट्रवादी)
- शिवाजी उद्यमनगर – सचिन पाटील (राष्ट्रवादी)
- यादव नगर – शमा मुल्ला (राष्ट्रवादी)
- राजारामपुरी – संदीप कवाळे (राष्ट्रवादी)
- तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल – प्रतिज्ञा निल्ले (शिवसेना)
- टाकाळा खण – सविता भालकर (भाजप)
- राजारामपुरी एक्सटेन्शन – मुरलीधर जाधव (राष्ट्रवादी)
- दौलत नगर – विलास वास्कर (ताराराणी आघाडी)
- प्रतिभा नगर – छाया पोवार (कॉंग्रेस)
- पांजरपोळ – भाग्यश्री शेटके (भाजप)
- शास्त्रीनगर – नियाज खान (शिवसेना)
- मंगेशकर नगर – विजय सूर्यवंशी (भाजप)
- कैलासगड स्वारी – संभाजी जाधव (भाजप)
- सिद्धाळा गार्डन – सुनंदा मोहिते (ताराराणी आघाडी)
- फिरंगाई – तेजस्वीनी इंगवले (ताराराणी आघाडी)
- तटाकडील तालीम – अजित ठाणेकर (भाजप)
- रंकाळा स्टँड – शेखर कुसाळे (ताराराणी आघाडी)
- पंचगंगा तालीम – माधवी गवंडी (राष्ट्रवादी)
- लक्षतीर्थ वसाहत – अनुराधा खेडकर (राष्ट्रवादी)
- बलराम कॉलनी – राहुल माने (अपक्ष)
- दुधाळी पव्हेलीयन – प्रतापसिंह जाधव (कॉंग्रेस)
- चंद्रेश्वर – शोभा बोंद्रे (कॉंग्रेस)
- पद्माराजे उद्यान – अजिक्य चव्हाण (कॉंग्रेस)
- संभाजीनगर बसस्थानक – महेश सावंत (राष्ट्रवादी)
- नाथागोळे तालीम – जयश्री चव्हाण (कॉंग्रेस)
- संभाजी नगर – संतोष गायकवाड (भाजप)
- नेहरू नगर – ललिता बारामते (भाजप)
- जवाहर नगर – भूपाल शेटे (कॉंग्रेस)
- सुभाष नगर – सविता घोरपडे (ताराराणी आघाडी)
- बुद्ध गार्डन – वहिदा सौदागर (राष्ट्रवादी)
- सम्राट नगर – जयशी जाधव (भाजप)
- शिवाजी विद्यापीठ – प्रवीण केसरकर (कांग्रेस)
- राजेंद्र नगर – लाला भोसले (कॉंग्रेस)
- स्वतंत्रसैनिक वसाहत – रूपाराणी निकम (ताराराणी आघाडी)
- रामानंद नगर – सुनील पाटील (राष्ट्रवादी)
- कळंबा फिल्टर हाउस – वृषाली कदम (कॉंग्रेस)
- तपोवन – विजयसिंह खाडे-पाटील (भाजप)
- राजलक्ष्मी नगर – दीपा मगदूम (कॉंग्रेस)
- रंकाळा तलाव – शारंगधर देशमुख (कॉंग्रेस)
- फुलेवाडी – इंदुमती माने (कॉंग्रेस)
- फुलेवाडी रिंगरोड – रीना कांबळे (कॉंग्रेस)
- सानेगुरुजी वसाहत – मनीषा कुंभार (भाजप)
- आपटेनगर – राजू दिन्डोर्ले (अपक्ष)
- साळोखे नगर – प्रतीक्षा पाटील (कॉंग्रेस)
- शासकीय मध्यवर्ती कारागृह – अश्विनी रामाने (कॉंग्रेस)
- रायगड कॉलनी – गीता गुरव (भाजप)
- सुर्वे नगर – मेघा पाटील (राष्ट्रवादी)
- क्रांतीसिंह नाना पाटील नगर – वनिता देठे (कॉंग्रेस)
- जीवबानाना पाटील नगर – अभिजित चव्हाण (शिवसेना)
Leave a Reply