
कोल्हापूर :ग्यान – केंद्रिय मंत्रिमंडळाने ग्यान या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा उददेश जगातील नामवंत प्राध्यापक, शास्त्रज्ञ, उद्योग, क्षेत्रातील तज्ञ यांचे मार्गदर्शन भारतीय विद्यार्थी व प्राध्यापकांना प्राप्त व्हावे हा आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील भारताची वाटचाल जगाच्या बरोबरीची असावी. भारतीय शिक्षण क्षेत्राने कुशल मनुष्यबळ तंत्र व शास्त्र क्षेत्रांना पुरवावे, एकूणच देशाच्या प्रगतीला तंत्र व शास्त्र क्षेत्रांमुळे गती प्राप्त व्हावी, अशा व्यापक उददेशाने या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आय.आय.टी., एन.आय.टी., केंद्रिय विद्यापीठे यांच्यासाठी असणाऱ्या या प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू प्रा.डॉ.देवानंद शिंदे व ग्यान समन्वयक प्रा.डॉ.आर.के.कामत यांच्या कार्यतत्परतेमुळे सहभाग नोंदवता आला व त्यामुळेच 7 प्रकल्पांना मान्यता मिळाली. अशाप्रकारे ग्यान प्रकल्पामध्ये सहभाग घेणारे शिवाजी विद्यापीठ हे एकमेव राज्य विद्यापीठ ठरले. बी.सी.यू.डी. संचालक डॉ.डी.आर.मोरे, रजिस्ट्रार डॉ.व्ही.एन.शिंदे, वित्त व लेखा अधिकारी डॉ.ए.बी.चौगुले, परीक्षा नियंत्रक श्महेश काकडे या सर्वांचे ग्यान प्रकल्पाला सहकार्य आहे. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.जयदीप बागी यांनी ‘मेकॅट्रॉनिक्स’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे या दृष्टीने अल्पावधीतच नियोजन केले. प्रा.उदय पाटील (प्रकल्प समन्वयक) व त्यांचे सहकारी त्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर या शाखामध्ये प्रचंड बदल गेल्या काही वर्षात सातत्याने घडत आहेत. त्यामुळे संगणक संचलित वस्तूंचे सेवांचे प्रमाण वाढत आहे. केवळ आणि केवळ यांत्रिकी वस्तंचे प्रमाण कमी होत आहे. यंत्रामध्ये, उत्पादनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर त्याच बरोबर कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर वाढल्याने उत्पादन रचना, विकास निर्मिती यामधील एकच एक विद्याशाखेची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. भविष्यामध्ये आंतरशाखा अभ्यासक्रमांची प्रचंड गरज निर्माण होणार आहे. स्किल इंडिया सारख्या प्रकल्पांना आवश्यक मनुष्यबळाचा पुरवठा करणे हे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञान अधिविभागाने म्हणूनच ‘मेकॅट्रॉनिक्स’ या आंतरशाखा विषयावर ही 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा दि.11 जुलै, 2016 रोजी आयोजित केली आहे. तंत्रज्ञान अधिविभाग दशकपूर्तीनिमित्त साजरा करत असलेल्या विविध उपक्रमातील हा पहिलाच उपक्रम आहे.
या कार्यशाळेत एशियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या जगातील पहिल्या 50 अग्रगण्य विद्यापीठात स्थान असणाऱ्या विद्यापीठाचे प्रा.डॉ.मनुकिड हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या या विद्यापीठाशी असलेल्या सामंजस्य कराराला पुन्हा उजाळा मिळणार आहे
Leave a Reply