
कोल्हापूर : श्री विजयसिंह यादव प्रतिष्टान पेठ वडगाव आणि शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १८ जुलै या दरम्यान विजयवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात सुमारे २०० हून अधिक शाळा आणि कॉलेजमधील सहा हजार शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यर्थ्यांचा सहभाग असणार आहे.तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्राचार्य सरदार जाधव आणि सचिव डॉ.सचिन पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.महोत्सवाचे यंदाचे ३ रे वर्ष असून ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या उद्देशाने या अशा महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या सचिव विद्याताई पोळ यांनी केले आहे.यास संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ आणि उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांचे प्रोत्साहन आणि उपस्थिती लाभली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन १४ जुलै रोजी जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विलास शिंदे असणार आहेत.तसेच १८ जुलै रोजी समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी जिल्हा वनअधिकारी रंगनाथ नाईकडे यांची उपस्थिती असणार आहे.चारही दिवसात भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.यात रांगोळी,वकृत्व,चित्रकला,निबंध स्पर्धा,रक्तदान शिबीर आणि श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे हा भाव-भक्ती गीत कार्यक्रम होणार आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वृक्षारोपण आणि ओर्गानिक शेती असे प्रकल्प संस्थेच्या वतीने विद्यर्थ्यांचा सहभागाने हाती घेतले आहेत.महोत्सवाच्या समारोप समारंभात यशवंत-गुणवंत शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी आणि विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस समारंभ होणार आहे.
Leave a Reply