
कोल्हापूर:कोल्हापूर गणेशोत्सवास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारखा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव इतर कोठेही एवढ्या जल्लोषात व शांततेत साजरा केला जात नाही. गणेशोत्सव जवळ आला कि पोलीस प्रशासन डॉल्बी विरोधी मोहीम हाती घेते आणि मंडळांवर दबावतंत्राचा वापर करून डॉल्बी विरोधात सक्ती केली जाते. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाच्या आधीन राहून डॉल्बीस परवानगी द्यावी, परंतु मंडळांवर प्रशासनाची सक्ती नको, असे प्रसिद्धीपत्रक आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या शहरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी पाउल उचलले आहे. याबाबत पोलीस प्रशासन आणि डॉल्बीधारक यांची बैठक पार पडली. वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षात पोलीस प्रशासनाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाच्या दिलेल्या हाकेला सर्व करवीरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. डॉल्बी साउंड सिस्टीम आरोग्यास हानिकारक आहेच, पण लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत गतवर्षी अनेक मंडळानी पारंपारिक वाद्यावर भर दिला होता.
गणेशोत्सवामध्ये मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असतात. समाजातील विविध स्तरातील घटकांना एकत्र आणण्याचे, सामाजित बांधिलकी जपण्याचे आणि विविध विषयांवर समाज प्रबोधन करण्याचे काम गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडत आहे. परंतु रस्त्यावर मंडप न घालणे, मिरवणुकीत विनाकारण मंडळावर दडपशाही करणे, अशा प्रशासनाच्या भूमिकांनी गणेशोत्सवामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होत नाही. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करून डॉल्बी साउंड सिस्टमचा वापर करण्यास कोणाचीही हरकत नसावी. कायद्याचा बडगा उगारून कोणीही अन्यायकारक कारवाई करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. कायदा फक्त हिंदू धर्मियाच्या सणान पुरताच मर्यादित आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. प्रार्थना स्तळावर असणाऱ्या अवैध्य भोंग्यावर कारवाई करण्याचे निर्देश मे. न्यायालयाने दिले असून, दोन दिवसांपूर्वी मे.उच्च न्यायालयामध्ये झालेल्या याचिके दरम्यान अशा अवैध्य भोंग्यावर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. असे असताना फक्त हिंदू धर्मियांच्या सणावर कारवाईची बडगा उगारणे चुकीचे आहे. जी तत्परता गणेशोत्सवाच्या बाबतीत दाखविली जाते तीच कारवाईची तत्परता इतर मे. न्यायालयाच्या निर्णयांबाबत का दाखविण्यात येत नाही, याची माहिती प्रशासने द्यावी.
कोल्हापूर शहरात आज सुमारे ५०० डॉल्बी व्यावसायिक आहेत. तर याच व्यवसायाशी निगडीत लाईट, जनरेटर आदींची संख्या हजाराच्या पटीत आहे. एकीकडे वाढत्या बेरोजगारीने युवक हवालदिल झाले असताना, त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायावर प्रशासन बंदी आणून त्यांचे रोजगार नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे. आजच्या युवा पिढीला डॉल्बी चे आकर्षण आहे, त्यामुळे त्यांच्या आनंदावर कोणीही विरजन घालण्याचा प्रयत्न कोनीही करू नये. त्याच बरोबर मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही संयमाची भूमिका घेऊन, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाच्या आधीन राहून डॉल्बीचा वापर करावा. गणेशोत्सवासह त्र्यंबोली यात्रा शांततेत पार पाडण्यास प्रशासनाची मदत करावी, जेणे करून हिंदू धर्माचा धार्मिकपणा अबाधित राहून कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण अवघ्या महाराष्ट्रा पुढे येऊ देत, असेही आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल आहे.
Leave a Reply