आपत्ती काळात सर्व घटकांनी सतर्क राहावे:जिल्हाधिकारी

 

DSC_6849कोल्हापूर :  गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरु पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. या स्थितीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील सर्व घटकांनी सतर्क राहून आपाआपली जबाबदारी कोटेकोरपणे पार पाडावी आणि जीवित हानी टाळावी,अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केल्या. आपत्तीच्या काळात लागणाऱ्या जेसीबी, गॅस कटर, इन्फ्लेटेबल बोट, ओबीएम मशिन, ब्रेकर आदी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. आवश्यकतेनुसार ज्या ठिकाणी लोकांना स्थलांतरीत करण्यात येणार आहे त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता ठेवावी आणि साथिचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले .

गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस होत आहे या पार्श्वभुमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी महानगरपालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, जलसंपदा विभागाचे किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.एस.पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक एस.एस.साठे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महानगरपालिका क्षेत्रातील सुतारवाडी, सिध्दार्थनगर,कुंभारगल्ली या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी उलपेमळा येथील राहिवाशांना पाण्याचा धोका जास्त असल्याने त्यांना तात्काळ हलवणे आवश्यक आहे. त्यांना अन्न व स्वच्छ पेयजल व आरोग्य सेवा यांची व्यवस्था ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!