
कोल्हापुर : प्रती पंढरपुर म्हणजेच नंदवाळ या ठिकाणी आषाढ़ी एकादशी निमित्त लाखो वारकरी यांनी घेतले विठ्ठल रखुमाई चे दर्शन. दिडी दरम्यान पुईखडी येथे माऊलीचा विसावा आणि नयनमनोहर रिंगण सोहळा पार पडला . यवर्षीही कोल्हापूरच्या दानशुर व्यक्तींनी आलेल्या सर्व वर्कर्यांसाठी फराळ आणि दूध याची मोफत सोय केली होती. तसेच महापौर सौ.अश्विनी रामाणे, नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या हस्ते उपस्थित सर्व वारकरी आणि भाविक यांना मोफत फराळ वाटप करण्यात आले. आनंद लाड महाराजांच्या पालखीचे आगमन पुइखड़ी येथे झाले. त्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. 5 फेऱ्या रिंगण मानाच्या अश्या घोड्याने घातले. त्यावेळी विठ्ठल नामाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमला.त्यानंतर पालखी पुढे नंदवाळला रवाना झाली.पावसाने उघडीप दिल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सुसज्ज पोलिस यंत्रणा यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
Leave a Reply