
कोल्हापूर:(राजेंद्र मकोटे)जवानांनी आपले बलिदान देऊन संयमितपणे मिळविलेल्या कारगिल विजयाचा २६ जुलै हा दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा अशी अपेक्षा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली.अभिमानस फौंडेशनच्यावतीने सलाम कारगिल तिरंगी टॅटू आणि सलाम कारगिल या गाण्याच्या ऑडीओ सीडीचे प्रकाशन आज समारंभपूर्वक करण्यात आले. संस्थापक गौरव कोल्हापूरकर यांनी सर्वांचे स्वागत करून जिल्ह्यात तीन लाख शालेय मुलांना या टॅटूचे वितरण करण्यात येणार आहे.तरी या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन फौंडेशनच्यावतीने करण्यात आले.तसेच भावी पिढीच्या मनात राष्ट्रीयत्वाची आणि देशप्रेमाची भावना जागविण्यासाठी हा एक अनोखा प्रयत्न आहे.असेही ते म्हणाले.
यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे,शाहू गव्हर्नमेंट बँकेचे किरण जाधव,डॉ.संदीप पाटील या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सलाम कारगिल गाण्याचे रचनाकार फिरोज शेख,गीत आणि संगीतकार अशोक मालगावे,संकलक शेखर गुरव,यांचाही सन्मान करण्यात आला.तसेच प्रेस फोटोग्राफर संदीप मोरे आणि पप्पू अत्तार यांचा गौरव करण्यात आला.यावेळी माजी सैनिक संघटनेचे एन.एन.पाटील,सांगवडेकर,लायन्स क्लब चे पारीखसर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply