
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याची रक्तवाहिणी म्हणून ओळखल्या जाणार्या सी.पी.आर. ब्लड बॅंकेत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सी.पी.आर मध्ये होणार्या छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया खोळंबल्या असून, रुग्ण रक्ताच्या प्रतिक्षेत आहेत.
हा सी.पी.आर.मधील रक्ताचा तुटवडा भरुण काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री, महसुल व सार्वजनीक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी केलेल्या आवहाना नुसार भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने भाजपा जिल्हा कार्यालय, बिंदु चौक येथे मंगळवार दि. १९ जुलै २०१६ रोजी सकाळी ९ वाजले पासून दुपारी ४ पर्यंत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबीरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्याचबरोबर कोल्हापूरच्या सर्व सामान्य जनतेने देख़ील या रक्तदान शिबीरात मोठा सहभाग दर्शवावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप सुरेशराव देसाई यांनी केले आहे.
Leave a Reply