
रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील महाड जवळचा ब्रिटिश कालीन पूल कोसळला , 10 ते 15 वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.मुंबई गोवा महामार्गावर महाड नजीक राजेवाडी फाट्याजवळ असलेला सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल मंगळवारी रात्री उशिरा वाहून गेला, कमकुवत झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला, त्यामुळे पोलादपूर वरून महाडकडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे यात दोन एसटी बसेस चा समावेश असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त होत आहे जयगड मुंबई आणि राजापूर बोरिवली या दोन बसेस चा संपर्क होत नसल्याचं सांगितले जात आहे, धोधो कोसळणारा पाऊस आणि अंधार यामुळे रात्री बचाव कार्यात अडथळे येत होते दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे सकाळी हे बचाव कार्य सुरु होण्याची शक्यता आहे, या पुलाशेजारी नवीन पूल असल्याने त्यावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.
Leave a Reply