कोल्हापूर:पुण्यातील प्रसिद्ध वास्तुशास्त्रा चे
पुरस्कर्ते आणि साहित्यिक हरिभाऊ लिमये यांच्या जीवनप्रकाश या कादंबरीवर आधारित याला जीवन ऐसे नाव या चित्रपटाची निर्मिती स्वतः हरिभाऊ लिमये यांनी केली आहे.वयाच्या ७० व्या वर्षी अगदी तरुणांना लाजवेल असे कार्य लिमये यांनी केले आहे.एका मराठी चित्रपटची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.या चित्रपटात दोन घट्ट मित्रांची कथा आहे.या कथेस अनुसरून कलाकारांच्या साथीने लिमये यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी हा चित्रपट पुर्ण केला.जय मल्हार मालिकेतील बानू म्हणजेच ईशा केसकर हिची करिअरची सुरुवात या चित्रपटातून झाली आहे. तसेच विलास उजवणे,किशोर महाबोले,उमा सरदेशमुख,दीपज्योती नाईक,केतन क्षीरसागर,प्रीयांशी माने,किरण रोगे,पंकज विष्णू,आणि कै.सतिश तारे हेही या चित्रपटात दिसणार आहेत.सतिश तारे यांनी भूमिका केलाला हा शेवटचा चित्रपट आहे.यात एकूण ४ गाणी असून गीतकार श्रीकांत नरुले यांच्या गीतांना लहू माधव यांनी संगीत दिले आहे.येत्या ५ ऑगस्ट रोजी महारष्ट्रात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.उत्तम कथानक,कलाकारंचा दमदार अभिनय,लोकांना आपलीशी वाटणारी हि कलाकृती यामुळे या चित्रपटास भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास हरिभाऊ लिमये यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Leave a Reply