
कोल्हापूर: बजरंग दलाचे शहर प्रमुख आणि महाद्वार रोड येथील व्यावसायिक महेश उरसाल यांचेकडून २५ जुलै रोजी महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी सातारा जिल्यातील फलटण येथून जया बबनराव शिंदे या महिला पर्यटक आपल्या कुटुंबीयांसोबत आल्या होत्या.उरसाल यांच्याकडून त्यांनी लेडीज पर्स खरेदी केली आणि त्या निघून गेल्या.पण आपली कापडी पिशवी त्या तिथेच विसरल्या.महेश उरसाल यांच्या लक्ष्यात हि बाब आली.त्यांनी टी कापडी पिशवी लगेच ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवली.त्या पिशवीत २ स्टील चे डबे होते त्यात सुमारे २ लाख किमतीचे सोन्याचे दागिने आढळले.थोड्या वेळातच घाबरलेल्या अवस्थेत जया शिंदे तिथे आल्या.त्यांनी पिशवीची विचारपूस करताच ओळख पटवून घेऊन महेश उरसाल यांनी प्रमाणीकपाणाचा आपला वारसा जोपासत दागिने असलेली पिशवी जया शिंदे यांना परत केली.कोल्हापूरचा जसा दानशूर पानाचा वारसा आहे तसेच प्रामाणिक पणाही अंगी जोपासला आहे हे महेश उरसाल यांनी सिद्ध केले.त्या महिलेने उरसाल यांना आभाराचे लेखी पत्रही पाठविले आहे.
Leave a Reply