
चुकीचा वज्रलेप,महिला कैद्यांकडून प्रसाद बनवून घेणे आणि चांदीच्या रथातील भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी गप्प का:हिंदु विधीज्ञ परिषदेचा आरोप
कोल्हापूर : डॉ.अमित सैनी हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ते अध्यक्ष आहेत.पण अंबाबाई लाडू प्रसाद महिला कैद्यांकडून बनवून घ्यायचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला.मूर्तीच्या वज्रलेपात नाग घडविण्याचे राहिले.अजूनही मूर्तीवर नाग नाही.आणि आता चांदीच्या रथातील भ्रष्टाचार.इतक्या गोष्टी मंदिरात घडत आहेत.लोकांच्या भावनांशी खेळ सुरु आहे तरी हे अध्यक्ष असून अजूनही गप्प का आहेत.मुख्यमंत्री यांनी २ वर्षापूर्वी पाठवलेल्या पत्राला ते केराची टोपली दाखवितात पण मंदिरात महिलांना शौचालय नाही याचा साधा विचारही करत नाहीत.असे डॉ.अमित सैनी गप्प का आहेत.की त्यांना त्याचे गांभीर्य समजत नाही असा आरोप आज हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र इचलकरंजीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.चांदीच्या रथाबाबत नियमांचा भंग झालेला आहे.शुद्धतेचे प्रमाणपत्र नाही,चांदी किती वापरली याचा हिशोब नाही.हि लोकांची फसवणूक आहे.असेही ते म्हणाले.पोलीस आणि सीबीआय चा साक्षीदार म्हणून संजय साडविलकर याचे नाव घोट्याळ्यात आहे म्हणून हे गप्पा आहेत का,संजय कुमार पानसरे खून प्रकरणी सतत कोल्हापुरात येऊन पत्रकार परिषदा घेतात मग देवस्थान समितीच्या घोट्याळ्याची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे मग यात का ते लक्ष घालत नाहीत असेही ते म्हणाले.अंबाबाई मंदिर म्हणजे सोन्याची अंडे देणारी कोंबडी झालेली आहे त्यामुळे मनमानी कारभार चालू आहे.असे बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख बंडा साळोखे यांनी टीका केली. मूर्तीवरील नाग घडविण्याचा राहिला याबाबत कोल्हापूरची जनता यांना कधीही माफ करणार नाही.असे महालक्षमी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीचे सदस्य प्रमोद सावंत यांनी सांगितले.सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे प्रवक्ता सुनील घनवट म्हणाले.येत्या ८ दिवसात महिला शौचालयाबाबत निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांनी दिला.हिंदुस्तानात फक्त हिंदूंच्याच मंदिरांवर अन्याय का असा सवाल अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला.सैनी यांनी कोणत्याही गैरसमजात राहू नये.संजय कुमार फक्त आपला चेहरा चामकविण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात.पण कोल्हापूरची जनता सुजाण आहे.मंदिरातील प्रत्येक व्यवहाराची माहिती त्यांना मिळालीच पाहिजे.नाहीतर यांच्यावर आम्ही खटले दाखल करू असे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळकर यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला हिंदु परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply