
कोल्हापूर: जात, धर्म यापेक्षाही मीठाला जागणेअत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाण्याचा ऐतिहासिक वारसा या भारतभूमीला लाभलेला आहे, असेप्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचेप्रा.स्टुअर्ट गॉर्डन यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासअधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअलक्लासरुममध्ये आयोजित ‘अठराव्याशतकातील दख्खन’ या विषयावरीलकार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.’ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठातआयोजित करण्यात आलेली ही तिसरीव्याख्यानमाला आहे.
प्रा. गॉर्डन म्हणाले, आठ हजार वर्षांपूर्वीपासूनमटण, मासे टिकवून ठेवण्यासाठी मीठउपयोगात आणले जात होते. इतिहास काळातमीठाचा उपयोग फक्त जेवणामध्येच होत नसे, तर आपल्या मातीशी एकनिष्ठ, इमानीराहण्यासाठी सैनिकांना मीठ देऊन शपथ दिली जात असे. ही मीठाला जागण्याची परंपरा केवळ मध्ययुगीन भारतातच नव्हे, तर मध्य आशियामध्येही प्रचलित असल्याचे दिसते.’बाबरनामा’मध्येही पराभूत सैनिकांना आपल्या सैन्यात नव्याने प्रवेश देताना मीठाला जागण्याची शपथ देण्याची परंपरा प्रचलित असल्याचे संदर्भ मिळतात. मिर्झाराजे जयसिंग, शहाजी महाराज, शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातली या संदर्भातील अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
Leave a Reply