
कोल्हापूर: माजी आरोग्यमंत्री कै.दिग्विजय खानविलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने खुल्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन येत्या ९ आणि १० ऑगस्ट रोजी जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन,नागाळा पार्क येथे करण्यात आले आहे.दिग्विजय फौंडेशनच्या सहकार्याने या स्पर्धा होत असून स्विस लिग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण ९ फेऱ्या होणार आहेत.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.स्पर्धेचे उद्घाटन ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार असून ११ वाजता स्पर्धा सुरु होतील.पुणे,मुंबई,सातारा,बेळगाव,हुबळी,सांगली,रत्नागिरी,गोवा आणि स्थानिक खेळाडू येथून सुमारे २०० खेळाडू यात सहभागी होतील.तसेच नामांकित बुद्धिबळपटूही यात सहभागी होणार आहेत.एकूण ४५ हजार रुपयांची बक्षिसे असून विजेत्यास १० हजार रोख आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.असे संघटनेचे सचिव भरत चौगुले यांनी सांगितले.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पंधरा वर्षाखालील स्पर्धकांना ३००/- आणि पंधरा वर्षावरील स्पर्धकांना ४००/- इतके नोंदणी शुल्क आहे.नाव नोंदणी ८ ऑगस्ट पर्यंत करणे आवश्यक असून यासाठी निलाह मुल्ला ९४२००१०२३४,भरत चौगुले ९८५०६५३१६० या क्रमांकावर संपर्क साधवा.यावेळी संघटनेचे उत्कर्ष लोमटे,प्रीतम घोडके,निहाल मुल्ला,दत्ता मोरे,तुषार शर्मा आदि उपस्थित होते.
Leave a Reply