
कोल्हापूर: कारगिल युद्धापासून गेली १७ वर्षे अविरतपणे सीमेवरील जवानांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त १ लाखहून अधिक राख्या पाठविल्या जातात.ता वर्षीही श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे.यासाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा येथील शाळा,महाविद्यालये,बचत गट,संस्था,व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले आहे.सीमेवर आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांचे हात राक्षबंधनदिवशी रिकामे राहू नयेत यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर यांच्याकडे संकलित राख्या महापौर अश्विनी रामाणे,भगिनी मंचच्या वैशाली क्षीरसागर,निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड,निवृत्त मेजर एन.एन.पाटील,यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात येणार आहेत.तरी जास्तीत जास्त भगिनींनी यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन ट्रस्टच्या वतीने केले आहे.राख्या संकलनासाठी प्रबोधन क्लासेस-आझाद चौक,अंबा कसेट हाउस-वांगी बोळ,कामत झेरॉक्स-टेंबे रोड,काटे मेडिकल-मंगळावर पेठ,पतंजली शॉपी-खरी कॉर्नर,भगिनी मंच-शनिवार पेठ,पियू शॉपी-ताराबाई पार्क,भिवटे पोहे सेंटर-महाद्वार रोड यासह बांबवडे,राधानगरी,कागल,गारगोटी,इचलकरंजी येथे राख्या संकलित केल्या जातील असेही घाटगे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस राजेंद्र मकोटे,सौ.सीमा मकोटे,कमलाकर किलकिले,सुखदेव गिरी,डॉ.सायली कचरे,माधुरी नकाते,प्रशांत बरगे,धनंजय नामजोशी,मालोजी केरकर यांच्यासह ट्रस्टचे सदस्य आणि सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply