महाद्वार रोड येथे भिंत कोसळून वृद्ध महिला ठार

 

कोल्हापूर : महाद्वार रोड येथील कोडोलीकर यांच्याकडे भाडेकरू म्हणून रहात असलेल्या कुलकर्णी कुटुंबावर आज अचानक काळाने घाला घातला.लतिका माधव कुलकर्णी (वय६०) या आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक करत असताना शेजारील गोसावी वाड्याची भिंत अचानक कोडोलीकर यांचं पत्र्यावर पड्ल्याने लतिका कुलकर्णी जखमी झाल्या.त्यांना उपचारासाठी त्वरित सीपीआर येथे नेण्यात आले.पण उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.तसेच त्यांचा मुलगा संतोष माधव कुलकर्णी (वय २७) हा यात जखमी आहे.याची नोंद जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!