
कोल्हापूर: भाजपा प्रदेश अनुसुचीत जाती प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी हे दि.०३ ऑगस्ट २०१६ रोजी कोल्हापूर दौर्यावर होते. भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाजपा कोल्हापूर महानगर अनुसुचीत जाती आघाडीचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री पारधी यांनी कोल्हापूरात छत्रपती शाहु जन्मस्थळ, महालक्ष्मी मंदीर याठिकाणी भेट दिल्यानंतर भाजपा कार्यालयात त्यांनी भाजपा कोल्हापूर महानगर अनुसुचीत जाती आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सामान्य नागरीकांसाठी, शेतकर्यांसाठी, स्वातंत्र्यानंतर अजुनही मागास असणार्या अनेक समाज बांधवांसाठी तसेच अनुसुचीत जातीच्या सर्वांगीन विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. जन-धन, पंतप्रधान आवास, सुकन्या, मुद्रा यासारख्या अनेक योजनांची माहिती लोकांना दिली पाहिजे. त्याचप्रमाणे समाजकल्याण खात्याच्या अधिकार्यांशी समंन्वय साधुन राज्य सरकारकडून उपलब्ध झालेल्या योजना समाजबांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी सतत कार्यशील रहावे असे प्रतिपादन केले.
भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या अनुसुचीत जाती आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी प्रास्तावीक केले. भाजपा अनुजा आघाडी कोल्हापूर महानगर अध्यक्ष यशवंत कांबळे यांनी कोल्हापुर शहरातील अनुसुचीत जाती आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख करुन देऊन शहरातील कामाचा आढावा दिला.
या कार्यकर्ता मार्गदर्शन बैठकीत कु.मयुरी संजय भोपळे(सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) या परिक्षेत अनुजा जाती-जमाती प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्द व कु.प्रियांका संजय ताडे ही सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेबद्दल भाजपा प्रदेश अनुसुचीत जाती प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास भाजपा सरचिटणीस सुभाष रामुगडे, उपाध्यक्ष दिलीप मेत्राणी, नगरसेवक कमलाकर भोपळे, नगरसेवीका सौ अश्विनी बारामते, पपेश भोसले, अर्जुन वाघमारे, अक्षय लोखंडे, अक्षय कांबळे, अनील कामत, प्रमोद कांबळे, राजन शर्मा, रघुनाथ भोसले, सतीश कारंडे, प्रदिप केंगारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply