महाद्वार चौक दुर्घटनेतील कुलकर्णी कुटुंबीयांस भाजपा महानगच्यावतीने मदत

 

कोल्हापूर : महाद्वार रोड, महाद्वार चौक येथील नॉव्हेल एंटरप्रायजेसचे मालक माधवराव कुलकर्णी यांच्या ईमारतीच्या वरच्या मजल्यावरील भिंत आज सकाळी ११ वा.कोसळून यामध्ये त्यांच्या पत्नी व मुलगा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ सी.पी.आर रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान श्री माधव कुलकर्णी यांच्या पत्नी सौ.लतीका कुलकर्णी यांचे दुख:द निधन झाले. त्याचबरोबर त्यांचा मुलगा संतोष कुलकर्णी यास गंभीर दुखापत झाली आहे.
भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घटनास्थळी व सी.पी.आर येथे भेट देऊन दुर्घटनेची माहिती समजावून घेतली. यानंतर नाम.चंद्रकांतदादा यांना या संपुर्ण दुर्घटनेची माहिती दुरध्वनीवरुन देण्यात आली.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांस महाराष्ट्र शासन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने योग्य ती भरपाई मिळवुन देण्यासाठी भाजपा सक्षमपणे कार्यरत राहील. त्याचबरोबर कुलकर्णी कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे संतोष कुलकर्णी यांच्या उपचाराचा खर्च कोल्हापूर भाजपा महानगरच्यावतीने योग्यरित्या उचलला जाईल असे सांगीतले. कुलकर्णी परिवारावर ओढावलेल्या दुख:द प्रसंगात आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
असे पत्रक भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, सुभाष रामुगडे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, सुरेश जरग, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, हर्षद कुंभोजकर, दिलीप मेत्राणी, आर.डी.पाटील, अ‍ॅड.संपतराव पवार, अशोक कोळवणकर, सौ.भारती जोशी, सौ.मधुमती पावनगडकर आदींच्यावतीने प्रसिध्दिस देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!