सुप्रिम कोर्टाच्या नियमाआधीन राहून साउंड सिस्टमला परवानगी द्यावी : आम.राजेश क्षीरसागर

 

IMG-20160809-WA0228कोल्हापूर : कोल्हापूर गणेशोत्सवास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सारखा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव इतर कोठेही एवढ्या जल्लोषात व शांततेत साजरा केला जात नाही. गणेशोत्सव जवळ आला कि पोलीस प्रशासन साउंड सिस्टम विरोधी मोहीम हाती घेते आणि साउंड सिस्टम व्यावसायिकांसह मंडळांवर दबावतंत्राचा वापर करून साउंड सिस्टम विरोधात सक्ती केली जाते. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाच्या आधीन राहून साउंड सिस्टमस परवानगी द्यावी, परंतु साउंड सिस्टम व्यावसायीकांसह मंडळांवर प्रशासनाची सक्ती नको, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. गणेशोस्तव आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून साउंड सिस्टम व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत साउंड सिस्टम व्यावसायिक संघटनेने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

       या वेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरात साउंड सिस्टममुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी पाउल उचलले आहे. याबाबत पोलीस प्रशासन, साउंड सिस्टमधारक, मंडळे यांची बैठक पार पडली. वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षात पोलीस प्रशासनाने साउंड सिस्टममुक्त गणेशोत्सवाच्या दिलेल्या हाकेला सर्व करवीरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. साउंड सिस्टम साउंड सिस्टीम आरोग्यास हानिकारक आहेच, पण लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत गतवर्षी अनेक मंडळानी पारंपारिक वाद्यावर भर दिला होता. परंतु या वर्षी झालेल्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाने साउंड सिस्टम न लावण्याबाबत धमकी वजा सूचना दिल्या. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी काही साउंड सिस्टम व्यावसायिकांच्या दुकानातून साउंड सिस्टम जप्त केली आहे. प्रशासनाची ही दंडुकशाही असून साउंड सिस्टम व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायच न करु देणे, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.

       गणेशोत्सवामध्ये मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असतात. समाजातील विविध स्तरातील घटकांना एकत्र आणण्याचे, सामाजित बांधिलकी जपण्याचे आणि विविध विषयांवर समाज प्रबोधन करण्याचे काम गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडत आहे. परंतु रस्त्यावर मंडप न घालणे, मिरवणुकीत विनाकारण मंडळावर दडपशाही करणे, अशा प्रशासनाच्या भूमिकांनी गणेशोत्सवामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण होत नाही. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करून साउंड सिस्टम साउंड सिस्टमचा वापर करण्यास कोणाचीही हरकत नसावी. कायद्याचा बडगा उगारून कोणीही अन्यायकारक कारवाई करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. कायदा फक्त हिंदू धर्मियाच्या सणान पुरताच मर्यादित आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. प्रार्थना स्तळावर असणाऱ्या अवैध्य भोंग्यावर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून, दोन दिवसांपूर्वी मे.उच्च न्यायालयामध्ये झालेल्या याचिके दरम्यान अशा अवैध्य भोंग्यावर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. असे असताना फक्त हिंदू धर्मियांच्या सणावर कारवाईची बडगा उगारणे चुकीचे आहे. जी तत्परता गणेशोत्सवाच्या बाबतीत दाखविली जाते तीच कारवाईची तत्परता इतर न्यायालयाच्या निर्णयांबाबत का दाखविण्यात येत नाही, याची माहिती प्रशासने द्यावी.   

       कोल्हापूर शहरात आज सुमारे ४००० साउंड सिस्टम व्यावसायिक आहेत. तर याच व्यवसायाशी निगडीत लाईट, जनरेटर आदींची संख्या हजाराच्या पटीत आहे. एकीकडे वाढत्या बेरोजगारीने युवक हवालदिल झाले असताना, त्यांनी उभ्या केलेल्या व्यवसायावर प्रशासन बंदी आणून त्यांचे रोजगार नष्ट करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आहे. आजच्या युवा पिढीला साउंड सिस्टम चे आकर्षण आहे, त्यामुळे त्यांच्या आनंदावर कोणीही विरजन घालण्याचा प्रयत्न कोनीही करू नये. त्याच बरोबर मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही संयमाची भूमिका घेऊन, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाच्या आधीन राहून साउंड सिस्टमचा वापर करावा. गणेशोत्सवासह त्र्यंबोली यात्रा शांततेत पार पाडण्यास प्रशासनाची मदत करावी, जेणे करून हिंदू धर्माचा धार्मिकपणा अबाधित राहून कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण अवघ्या महाराष्ट्रा पुढे येऊ देत, असेही आवाहन आमदार  राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.  

       कोल्हापूर जिल्हा साउंड लाईट आणि जनरेटर असोसिएशनने आमदार राजेश क्षीरसागर यांना दिलेल्या निवेदनामध्ये, कोल्हापूर जिल्हातील सर्वच लाइट आणि जनरेटर व्यावसायिकांनी येणाऱ्या गणेशोत्सव व नवरात्र काळात मे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच साउंड लावणार असून, नियमांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, प्रशासनास योग्य सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!