दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत समीर कठमाळेस विजेतेपद पुण्याचा चिन्मय कुलकर्णी उपविजेता

 

कोल्हापुर:IMG-20160811-WA0004दीग्विजय खानविलकर फौडेशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर रेल्वेचा समीर कठमाळेने साडेआठ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले.त्याला दहा रुपये रुपयाचे बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. अग्रमानांकित पुण्याचा चिन्मय कुलकर्णीने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले तर तृतीय क्रमांक मिरजेचा मुद्दसर पटेल चौथा क्रमांक उत्कर्ष लोमटे(कोल्हापूर) पाचवा क्रमांक रविंद्र निकमने(इचलकरंजी) पटकाविले.अपंग बुद्धिबळपटू शैलेश नेर्लेकर सहाव्या स्थानी झेप घेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचा बक्षिस समारंभ निपाणीचे उद्योगपती प्रविणभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजलक्ष्मी खानविलकर, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे सहसचिव अनिल राजे, भरत चौगुले, राजेंद्र मकोटे व प्रितम घोडके उपस्थित होते.राजेंद्र मकोटेनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अन्य बक्षीस विजेते सातवा क्रमांक – रोहित मोकाशी(सांगली) , आठवा- निहाल मुल्ला(कोल्हापूर) , नववा-अन्वित दामले (कोल्हापूर) , दहावा-प्रज्वल मुधाळे(हुपरी) , अकरावा-तुषार शर्मा(कोल्हापूर) , बारावा-श्रुती भोसले(रेंदाळ) , तेरावा – श्रीराज भोसले(रेंदाळ) , चौदावा-सुमित जोशी(कोल्हापूर) , पंधरावा-धिरज वैद्य(कोल्हापूर) , सोळावा-श्रीधर तावडे(कोल्हापूर) , सतरावा-आदित्य आळतेकर(कोल्हापूर) , अठरावा-अशोक कुलकर्णी(कोल्हापूर), एकोणिसावा-जयकुमार शेटे(कोल्हापूर), विसावा – संतोष रसाळ(कोल्हापूर) व एकवीसावा-जयेश मालपाणी(इचलकरंजी) याचबरोबर पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. सात वर्षाखालील उत्कृष्ट – प्रथम – गौरव रेंदाळे(जयसिंगपूर) , द्वितीय – अवनीश हंडूर(कोल्हापूर) , तृतीय – दिव्या पाटील(जयसिंगपूर) नऊ वर्षाखालील उत्कृष्ट-प्रथम-दिशा पाटील(जयसिंगपूर), द्वितीय – यश भागवत(कोल्हापूर) , तृतीय – हर्षिता काटे(वारणानगर), अकरा वर्षाखालील उत्कृष्ट – प्रथम – वरद आठल्ये(कोल्हापूर) , द्वितीय – रोहित बोडके(कारदगा) , तृतीय – आर्य मोरे(कोल्हापूर) , तेरा वर्षाखालील उत्कृष्ट -प्रथम – शर्विल पाटील(कोल्हापूर) , द्वितीय – आयुष पाटील(कोल्हापूर), तृतीय – सुजल जामसांडेकर(कोल्हापूर) ,पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट – प्रथम – अथर्व चव्हाण(कोल्हापूर) , द्वितीय – ज्योतीरादित्य जाधव(सातारा), तृतीय – अमृत घाडगे(सातारा), उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू – प्रथम – मृणालिनी घाडगे(सातारा) , द्वितीय – तृप्ती प्रभु(कोल्हापूर) , तृतीय – समृद्धी कुलकर्णी(कोल्हापूर), साठ वर्षावरील जेष्ठ बुद्धिबळपटू – प्रथम – भारत पाटोळे(निपाणी) , द्वितीय- आनंद कुलकर्णी(कोल्हापूर) व तृतीय – दादासाहेब गुरव(कोल्हापूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!