
कोल्हापूर : अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर नुकतेच रुजू झाले आहेत.
नंदकुमार काटकर हे मुळचे सातारा जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बी.एस.सी. ऍ़ग्रीकल्चर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथून एम. एस्सी ऍ़ग्रीकल्चर तर पुणे विद्यापीठ येथून एल. एल. बी चे शिक्षण पूर्ण केले आहे. कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पुणे विभागात नोंदणी उपमहानिरीक्षक म्हणून सेवा केली आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे विभाग पुणे येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या बरोबरच मंत्रालयातही काही काळ सेवा बजावली आहे.
000000
Leave a Reply