शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

 

कोल्हापूरScreenshot_20160816-171816: भारतीय स्वातंत्र्याचा ६९वा वर्धापनदिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता ध्यजवंदन करण्यात आले.

यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या वतीने विद्यापीठ परिसरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ‘फ्लॅग-ऑफ’ करून फेरीस सुरवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!