

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहाय्य्क जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, ग्राहक हक्क संरक्षण संघटनेचे संजय हुक्केरी, वसंत हेरवाडे, बी.जे.पाटील, सतीश फनसे, जगन्नाथ म्हाळंक, रेखा हांजे, सिमा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नजिकच्या काळात येणारा गणेशोत्सव समोर ठेऊन अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात नमुने घेऊन कारवाई करावी आणि त्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांची मदत घ्यावी असे विवेक आगवणे यांनी सांगितले. याबैठकीत बीएसएनएल बद्दलच्या कॉल ड्रॉपबाबतच्या विषयावर चर्चा झाली. यावर बीएसएनएलने अनेक ठिकाणी टॉवर बाबत सर्वे झाला असून येत्या काळात उभारणी होणाऱ्या टॉवरमुळे नेटवर्क सेवेत फरक पडले असे सांगण्यात आले. तसेच 15 ऑगस्ट पासून दर रविवारी लँडलाईनवरुन करण्यात येणारे सर्व कॉल बीएसएनएलने फ्रि केले असल्याचे सांगितले.
या बैठकीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सेवा नागरीकांसाठी सुलभ कराव्यात अशी मागणी ग्राहक हक्क संरक्षणच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शाळांमध्ये पुस्तके अथवा अन्य कोणतीही विक्री होऊ नये. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी त्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर जी औषधे लिहून देतात ती अन्य मेडिकलमध्ये उपलब्ध होत नाहीत. यासाठी केमिस्ट असोसिएशन यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून द्यावी आणि अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे संबंधितांवर कारवाई करावी, असेही निर्देश श्री. आगवणे यांनी दिले.
बैठकीत राधानगरी एसटी स्टँड कँटिन बंद असणे, घरपोच गॅस वितरण बाबतच्या तक्रारी, वीज बिल देयक तारखेनंतर मिळणे आदिंबाबत चर्चा झाली.
Leave a Reply