
मुंबई:समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील काही कर्तृत्ववान महिलांचा तसेच एका सामाजिक संस्थेला दरवर्षी झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कोल्हापूर येथे ‘हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या अपंगमित्र नसीमादीदी हुरझुक यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच ग्रामस्वछतेचे ध्येय बाळगून त्यासाठी कार्य करणा-या ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला’ सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कारांसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख या तीन मान्यवरांनी पुरस्काराच्या निवड समितीचे मानद सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावली. येत्या १९ ऑगस्ट २०१६ ला हा पुरस्कार प्रदान सोहळा डोंबिवली येथे सावित्रीबाई फुले सभागृह येथे संपन्न होत असून २८ ऑगस्टला हा सोहळा झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
Leave a Reply