
कोल्हापूर: सी.पी.आर रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु होण्याकरिता आवश्यक विभाग तातडीने सुरु करण्याकरिता आवश्यक निधी बाबत संबधित मंत्री महोदायांसह मा. पालकमंत्री यांचे कडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. आज सी.पी.आर मध्ये अभ्यागत समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटर विभाग सुरु होणे बाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सभागुहात लक्षवेधी प्रश्न मांडला होता. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने सी.पी.आर रुग्णालयास मंजूर झालेल्या सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाची पाहणीही समितीच्या वतीने करण्यात आली. सदर काम युद्धापातळीवर सुरु असून मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री, मा.पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून येत्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन करून विभाग रुग्णासाठी सुरु करण्यात येणार आहे.
सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटर मुळे सी.पी.आर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. अपघात परिस्थितीमधील एखादा रुग्ण दाखल झाल्यास स्कॅनींग करिता रुग्णास बाहेर पाठवावे लागते. त्यासाठी २ ते ३ तासांच्या वेळेचा अपव्यय होतो. हेच तास रुग्णासाठी हानिकारक ठरू शकतात. सी.पी.आर रुग्णालयामध्ये ही यंत्रणा उपलब्ध होणार असल्याने रुग्णावर तातडीने उपचार करणे सोयीस्कर होणार आहे. या सी.टी. स्कॅन यंत्राद्वारे रुग्णाचे पूर्ण बॉडी चेकअप होऊन त्याच्यावर अत्याधुनिक यंत्रांनी उपचार केले जाणार आहेत. तर ट्रामा केअर सेंटर चा वापरही अपघातग्रस्त रुग्णासाठी होणार असून या सेंटर मध्ये ११ व्हेंठीलेटर आणि २० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातील १० बेड आय.सी.यु. करिता आणि १० बेड सेमी आय.सी.यु. करिता आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णावर खाजगी रुग्णालयात होणारे लाखो रुपयांचे उपचार सी.पी.आर रुग्णालयात नाममात्र शुल्कात उपलब्ध होणार आहेत. सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटर मधील उपचार दारिद्र रेषेखाली नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. सी.टी. स्कॅन करिता खाजगी मध्ये येणारा हजारो रुपयांचा खर्च अंदाजे ३०० रुपयांमध्ये भागणार आहे. त्यामुळे सी.पी.आर रुग्णालयामध्ये रुग्णांना तातडीच्या सुविधा मिळणार आहेत.
यावेळी बैठकीच्या सुरवातीस मागील बैठकीचा आढावा घेणेत आला. त्यानंतर आजच्या बैठकीचे विषय मांडण्यात आले. यामध्ये सी.टी. स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी करण्यात आली. यामध्ये ओ.पी.डी. ते सी.टी. स्कॅन पर्यंत शेड, ट्रॉमा केअर सेंटर परिसरामध्ये बेंचेस बसविणे आवश्यक असल्याचे मागणी प्रशासनाच्या वतीने करणेत आली. याबाबत संबधित यंत्रणाकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न करू, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यानंतर मनोविकृती कक्ष, स्वाईन फ्लू वॉर्ड ची सध्यस्थिती जाणून घेण्यात आली. सदर विभाग नव्याने सुरु करण्यात आली असून, त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती डीन श्री.रामानंद यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ओ.पी.डी. मध्ये अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करावी, सुटसुटीत पार्किंग व्यवस्था करावी. बाहेरून येऊन अरेरावी करणाऱ्याना लगाम घालण्यासाठी बंदुकधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक रुग्णालय परिसरात करणेत यावी. रिक्त पदांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करणेत यावेत, अशा सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या.
यावेळी अपंग आन लाईन सर्टिफिकेट मिळण्यास वेळ लागत असल्याची माहिती सदस्यांनी दिली. याबाबत सूचना करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, अपंग सर्टिफिकेट मिळणाऱ्या ठिकाणांचे तालुका निहाय विकेंद्रीकरण करून ज्या त्या तालुक्याच्या तालुका रुग्णालयांमधून सदर सर्टिफिकेट रुग्णांना मिळणेची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना केली. त्याचबरोबर बेघर होम आणि नवजात शिशु विभाग वॉर्मर सुरु करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत. त्यानुसार पाठपुरावा करून आवश्यक निधी तातडीने मंजूर करणे सोपस्कर ठरेल, असे सांगितले. या बैठकीस अभ्यागत समिती सदस्य अजित गायकवाड, सुनील करंबे, महेश जाधव, एफ.एम.टी.वी.प्रमुख डॉ.दत्ता पावले, सी.टी. स्कॅनचे डॉ.संजय देसाई, डॉ. लोकरे, अर्थोपेडीक डॉ.बडे, भूलतज्ञ डॉ. मिसळ, शस्त्रक्रिया विभागाचे डॉ.देशमुख, डॉ.माळी, स्त्री रोग तज्ञ डॉ. शानबाग, डॉ. मिरगुंडे, राजीव गांधी योजना समन्वक डॉ. देठे, आदी उपस्थित होते.
Leave a Reply