
कोल्हापुर : कोल्हापुर दक्षिण मतदार संघाचे आमदार अमल महाडिक यांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकास मिळावा यासाठी मतदार संघातील सुमारे 50 हजारहुन अधिक लोकांना या सुरक्षा विमा योजनेचा लाभ स्वखर्चाने देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 35 लाख रूपयांची तरतूद केली आहे.
केंद्र शासनाने ही योजना देश भरातील लोकांसाठी सुरु केली. वर्षाला 12 रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येतो. ही अपघात विमा योजना असून पॉलिसी काळात अपघाती मृत्यु किंवा अपघातात शरीराचा अवयव निकामी झाल्यास 2 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
प्रत्येकी 12 रुपये प्रमाणे दरवर्षी 7 लाख याप्रमाणे 5 वर्षे ही रक्कम आमदार अमल महाडिक स्वखर्चाने भरणार आहे अशी माहिती अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ओलखपत्र, फोटो, राहिवशी दाखला, जन्मतारिख दाखला आणि राष्ट्रीय कृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. सर्व गणेशोत्सव मंडळे, तालीम संस्था यांना आवाहन करण्यात येत आहे. रक्षाबंधनच्या मुहूर्तवार ही भागीनिंसाठी भेट असेल असेही आमदार महाडिक यांनी सांगितले.
Leave a Reply