
मुंबई: कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्विय सहाय्यक राहुल बंदोड़े ,संपर्क प्रमुख अरूभाई दुधवाडकर यांचे समवेत खंडपीठ कृती समितीने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांची आज सकाळी 12.00 वाजता मातोश्री वर भेट घेतली.खंडपीठ आंदोलनाची माहिती देवुन मोहित शहा यांचे अहवालाचे पाश्वभुमीवर मंञीमंडळाने फक्त कोल्हापूरसाठी ठराव करावा, तसेच बजेटनमध्ये खंडपीठ इमारतीसाठी निधी द्यावा अशी मागणी करून निवेदंन देणेत आले .त्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांना फोन केला. मुख्यमंत्री यानी लगेच भेट देतो असे सांगितले आहे व लगेच मिटिंग बोलवतो असे सांगितले आहे .उद्धव ठाकरे प्रश्न समाजाचा आहे स्वस्त बसु नका असा सल्ला दिला तसेच शिवसेना कोल्हापुर बरोबर आहे व राहील असे सांगितले.या वेळी चर्चा करताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, हा प्रश्र गंभीर आहे, उच्च न्यायालयाने दहिहंडीबाबत निर्णय घेणे ऐवजी हा प्रश्र निकाली केला असता तर बरे झाले असते. ऊच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापणे बाबत ठोस निर्णय घेतले शिवाय बजेटमध्ये तरतूद कशी करावयाची, इमारत बांधुन ठेवली आणि मागणी प्रलंबित राहिली तर काय करावयाचे असा प्रश्रही ठाकरे यांनी उपस्थित केला.कोणत्याही परिस्थिती कोल्हापूर सर्किट बेंच होणेसाठी शिवसेना आग्रही राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.त्याचबरोबर मंञी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंञी यांची भेट होणेबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.उद्धव ठाकरे बोलत असताना मुख्यमंञी यांनी चार दिवसात कृती समिती भेट घेत असलेचे सांगितले.सदर भेटीकरीता आमदार राजेश शिरसागर यांनी विशेष प्रयत्न केले .खंडपी़ठ कृती समिती त्यांना विशेष धन्यवाद देते.यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंञक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अरूण पाटील, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, माजी उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, अभिजीत कापसे, रणजित गावडे, राहुल बंदोडे, सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव हे उपस्थित होते.
Leave a Reply