
कोल्हापूर :- तमाम महाराष्ट्रात अभूतपूर्व उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह नवरात्री उत्सवात आपल्या कार्यक्षेत्रात ग्रंथ पुस्तक वितरणातून विचारधन सर्वत्र पोहचवण्याचे आवाहन भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महापुरुषांची बालकासह पालकांनाही मोलाचे ज्ञान देणारी अगदी वीस रुपये किमतीच्या संक्षिप्त चरित्राची ३६ पुस्तके मालिकेसह सामाजिक मूल्य, राष्ट्रीय विचार, संस्कार शिलता, सामान्य ज्ञान विषयक पुस्तकाची ३३४ प्रकाशने भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेली आहेत .भविष्यात यामध्ये वाढच होईल.ग्रंथालय प्राध्यापक,शिक्षक,तरुण मंडळे,महिला बचत गट यासह वैयक्तिक संग्रहालयपर्यंत या विचार साधनेच्यावतीने फक्त पाच हजार रुपयात सात हजार दोनशे रुपयांची पुस्तके वाचकांना दिली जाणार आहेत.प्रतिवर्षी १२०० रुपये याप्रमाणे नवनवीन प्रकाशानासह पुस्तके घरपोच दिली जातील.तसेच लेखक आपले भेटीस या अंतर्गत साहित्य प्रकाशने आदि कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल.तरी इच्छुकांनी यासाठी सीमा राजेंद्र मकोटे ९०११७४४११७,काटे मेडिकल,नागेशकर व्यायाम शाळा,मंगळावर पेठ,कोल्हापूर,चाणक्य पतसंस्था,इचलकरंजी,रोहन स्वामी यांच्याशी संपर्क साधावा.
Leave a Reply