
कोल्हापुर : येथील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर(जेएसटीएआरसी)च्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत सुयश प्राप्त केले.यामध्ये विविध स्तरावरील घेतलेल्या परीक्षेत महिमा शिर्के,शौर्या शेटे,रिद्धी शेटे,नितीका खांडवाणी,आर्या खांडवाणी,रेणू चव्हाण,रुही शहा,आशा कांबळे,हीना शेख,विहान मेहता,विहान पटेल,गौरव पाटील,व्यंकटेश पै,अर्थ शितोळे,कनिष्क शिर्के,कनिष्क खंडवाणी,आयुष शानबाग,अमित भारतवॉच यांना यलो बेल्ट तर सोहम नागदेव,अनन्या चौगुले,सहाना बंदी या खेळाडूंना ग्रीन,श्रावणी जोशी जिगीशा सबनीस,दैविक भाटे,ज्योतिरादित्य क्षीरसागर,ओम कुलकर्णी,रोहन पिसाळ,रिषीकेश तिबिले यांना ग्रीन-१,यश्वी वस्सा,ध्येय वस्सा,सुवण पोवार,जिगीशा व्हटकर,मानस चौगुले,यांना ब्लु,स्नेहा दानोळीकार,प्रतिक सावंत या खेळाडूंना ब्लु-१ आणि अमेय चव्हाण याला रेड आणि आकाश सणगर,हारिस जासनाईक,आफताब जासनाईक यांना रेड बेल्ट मिळाला.तायक्वांदो परीक्षेतील या घवघवीत यशाकरिता या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक अमोल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच निलेश जालनावाला यांचे प्रोत्साहन मिळाले.
Leave a Reply