ह्द्द्वाढीमुळे शहराचा विकास; माझी लढाई शहराच्या विकासासाठीच :आ. राजेश क्षीरसागर

 

20160816_232023कोल्हापूर : माझा लढा हद्द्वाधीच्या विरोधात आहे. शिवाजी पेठेशी नाही, नागरिक रस्त्यावर आले तर अठरा गावे धुवून जातील. हे वक्तव्य दुर्वैवी आहे, अशी टीका आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यानी पत्रक प्रसिद्धीकरिता दिले आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, मी म्हंटलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून ग्रामीण आणि शहरी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम आमदार महोदायाकडून चालले आहे. माझ्या म्हणण्या मागील हेत हा, जर शिवाजी पेठेतील सर्व नागरिक हद्दवाढी करिता एकत्र रस्त्यावर आले, तर हा लढा एवढा व्यापक होऊन आंदोलनाचे रूप धारण करेल कि ज्यापुढे अठरा गावे एकत्रित आली तरी कोल्हापूरच्या या स्वाभिमानी जनतेपुढे फिके पडतील, असा होता. मी वैयक्तिक स्वरुपाची कोणतीही टीका आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर केलेली नाही.

त्याचप्रमाणे हि लढाई किंवा आंदोलन हे कोल्हापूर शहराच्या विकासासाठी असून ग्रामीण भागाशी माझी ही नाळ जोडलेली आहे. आज पूर्ण जिल्यातील येणाऱ्या नागरिकांचे काम तो कोणत्या मतदार संघातील आहे हे न विचारता अग्रक्रमाने त्यांच्या समस्या सोडवीत असतो. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या मनात माझ्याविषयी नाहक गैरसमज निर्माण करू नये. तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे काळाची गरज आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी पाठविलेल्या समितीनेही हद्दवाढ झालीच पाहिजे असा अहवाल दिल्या नंतरही विरोष करणे बरे न्हवे. लोकशाही पद्धतीनुसार आज ४४ वर्षाच्या रखडलेल्या हद्द्वाधीकारिता कोल्हापूर शहर झगडत आहे. त्यांचे म्हणणे रास्त असल्यानेच मा. मुख्यमंत्री व मा. पालकमंत्री हो हद्दवाढ व्हावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेचे एकूण बजेट, खर्च, जमा आदी सर्व गोष्टीबाबत महानगरपालिका दरवर्षी श्वेतपत्रिका जाहीर करत असते आणि कुठल्याही गोष्ट करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी कर्ज घेतले, जन आंदोलने केली, शहराच्या विविध प्रश्नासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरले म्हणजे हद्द्वाधीची मागणी करणे रास्त ठरत नाही, असे म्हणणे लोकप्रतिनिधीना शोभून दिसत नाही. त्यामुळे आमदार महोदयांनी नाहक ग्रामीण जनतेच्या मनात गैरसमज पसरवू नका, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!