
कोल्हापुर: शिवाजी महाराज यांचा इतिहास नेहमीच चुकीच्या पद्धतीने मांडला गेला.शिवरायांचा खरा इतिहास लोकांसमोर व्यवस्थितपणे मांडला जावा याच प्रयत्नाखातर शिवरायांच्या आयुष्यावरील त्यांचा खरा इतिहास सांगणारा शिवाजी द ग्रेट हा ग्रंथ येत्या २४ सप्टेंबर रोजी प्रकाशित करत आहोत.इतिहास तज्ञ बाळकृष्ण यांनी हा चार खंडांचा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. खऱ्या इतिहासाची नोन्द करणारे ते पहिले इतिहास संशोधक आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काढले.ग्रंथ प्रकाशन संबंधी माहिती देताना ते म्हणाले हा ग्रंथ इंग्रजी भाषेत असला तरी सर्वाना सहज वाचता येईल अश्या शब्दशैलीत लिहला आहे.या ग्रंथाचे पुनार्ज्जीविकरण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.१६८० पानाचा हा ग्रंथ असून चार खंडातील पहिल्या खंडात शहाजी राजे यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटना,प्रसंग यांचे खरे विवरण आणि चौथ्या खंडात शिवाजी महाराज स्वतः संशोधक म्हणून कसे होते,त्यांचे विचार,त्यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोन यावर विवेचन करण्यात आले असे असेही इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.त्याचबरोबर www.shivajithegreat.com या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे.या वेबसाईटवर संपूर्ण शिवरायांचा खरा इतिहास,संशोधन पुरावे,किल्ले यांचे डॉक्यूमेंटरी,दुर्मिळ चित्रे,पत्रे अस्सलपणे प्रसिद्ध केली जाणार असून भविष्यात शिवाजी द ग्रेट या ग्रंथाची पीडीएफ टाकण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.ही वेबसाईट मोबाईल तसेच कॉम्पुटरवर सहज बघता येणार असून कोल्हापूरचे सुपुत्र शिरीष जाधव यांनी या वेबसाईटची निर्मिती केलेली आहे.या वेबसाईट तसेच ग्रंथाद्वारे खरे शिवचरित्र जगातील प्रत्येकापर्यंत पोहचेल असा विश्वास इतिहस संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केला.पत्रकार परिषेदेला मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक,हर्षल सुर्वे,अमित अडसुळे,अभिजित कसबेकर,संजय शिंदे,दिलीप पाटील,अवधूत पाटील यासंह शिवप्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply