
कोल्हापुर : महालक्ष्मी मंदीराच्या महाद्वार येथील प्रवेश द्वाराजवळ सुरक्षा व्यवस्था देणारा पोलिस कॉन्स्टेबल अजित गणपती होगड़े बक्कल क्रमांक 2 याने आज अजब प्रकार केला. दुपारी 3 च्या सुमारास प्रीती माने रा. शिवाजी पेठ या महिलेच्या पर्स मधिल हजार रुपये काढून घेतल्याचे सीसी टीवी कॅमेरात कैद झाले.
सदर महिलेस हा पोलिस दाद देत नव्हता. महाद्वार रोड वरील व्यापारी आणि बजरंग दलाचे महेश उरसाल यांनी हस्तक्षेप केला. जूना राजवाड़ा पोलिस स्टेशन येथे सदर महिलेने तक्रार दिली. या पोलिस कॉन्स्टेबल ला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिसच चोर बनल्याने मंदिरातील सुरक्षा तसेच लोकांच्या वस्तु, दागिने यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
Leave a Reply