
अखंड सेवा आणि विश्वास जपणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कोल्हापुर विभागाचा हिरक महोत्सवी वर्धापनदीन
कोल्हापूर : अखंड सेवा आणि विश्वास जपणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कोल्हापुर विभागाचा हिरक महोत्सवी वर्धापनदीन आज 1 सप्टेम्बर रोजी साजरा होत आहे. आयुर्विमा महामंडळाचा कोल्हापूर विभागाचा २८ एप्रिल १९९१ पासून कार्यरत आहे. कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. कोल्हापूर विभागात एकूण १८ शाखा, ०५ सॅटेलाईट शाखा व ०५ मिनी ऑफिस असून ९६६ आधिकारी/कर्मचारी व ७३११
विमा प्रतिनिधी व्दारे आम्ही ३२.२५ लाख विमाधारकांना सेवा देत आहे.
भारतीय आयुर्विमा महमंडळाने आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान राखून आज पर्यंत १४.८५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांच्यासाठी
केली आहे. जसे कि रस्ते बांधणी, वीज निर्मिती, रेल्वे व पिण्याचे पाणी इत्यादी तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने २००६ मध्ये सुवर्ण जयंती
निमित्त गोल्डन ज्युबिली फौंडेशनची स्थापना केली ज्याद्वारे गुणवंत विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
विमाधारकांनच्या सोयीसाठी विविध बँके मार्फत विमा विक्री व सेवा देण्यासाठी बँक अशुरन्स चॅनेल सुरु केले आहे. विमाधारकांच्यासाठी विमा हप्ता भरण्यासाठी बँक, प्रीमियम पोईंट, पोर्टल इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच बंद पडलेल्या पॉलिसीसाठी रिव्हावल काम्पेन १५ सप्टेंबर पर्यटन उपलब्ध आहे. ज्यायोगे विमाधारक आपल्या विमा पॉलीसी परत सुरु करून आपले विमा संरक्षण अबाधित ठेवू शकतो. यामध्ये महामंडळाने दंड व्याजात ३०% पर्यंत सूट दिली आहे. विमाधारकांना त्यांच्या दाव्या बाबत तत्पर व अचूक
सेवा देणेसाठी महामंडळ neft योजने द्वारे सेवा देत आहे.
मागील वर्षी कोल्हाप्रूर विभागाने १,६६,००० पुर्नावधी दाव्यासह रु.३६२.६० कोटी विमा धारकांना दिले आहेत. तसेच ४५६८ मृत्यु दाव्यां ४८.१८ कोटी त्यांच्या वारसांना वेळेत दिले आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत ९८.५६ कोटी ४३८६७ विमाधारकांना वितरीत केले आहेत. व ९२३ मृत्यूदाव्याद्वारे २२.७२ कोटी विमाधारकांच्या वारसांना दिले आहे.
१ सप्टेंबर हा एलआयसी चा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. पण या वर्षी एल आय सीचे हिरक महोत्सवी वर्ष (१९५६-२०१६) असल्याने १ सप्टेंबर
ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज यानिमित्त शाखेमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये शालेय विधार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा,कॉलेज युवक आणि युवतींच्यासाठी वकृत्व स्पर्धा तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून महापालिकाच्या शाळांमधून डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
Leave a Reply