खेळक्रांतीचा आगाज पथदर्शी प्रकल्पाव्दारे अंगणवाडीतील मुलांचा डाटा तयार करण्याचे काम सुरु

 

20160902_212826कोल्हापूर : 2040 ऑलिंपिक्स मध्ये 100 पदक जिंकण्याच्या उद्देशाने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांनी तयार केलेल्या खेळक्रांतीचा आगाज या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 4 हजार अंगणवाडीतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या शिक्षकांच्या मदतीने अंगणवाडीतील मुलांचा डाटा तयार करुन पुढील कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली खेळक्रांतीचा आगाज या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे हेही उपस्थित होते. यावेळी खेळक्रांतीचा आगाज या उपक्रमांतर्गत एक महीन्याच्या कालावधीत केलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यानी सादर केला.
अंगणवाडीतील मुलांचे वयानुसार समुह तयार करुन त्याचे वजन, उंची यांच्या माहितीसह उंच उडी, लांब उडी अशा बेसीक चाचणीव्दारे त्यांच्यातील क्षमता, कल अणि गुण जाणून घेऊन डेटा तयार करण्यात येणार आहे. जिल्हा परीषदेच्या सहकार्याने कोल्हापुर जिल्हयातील 140 आंगणवाडी पर्यवक्षकांना नुकतेच प्रशिक्षण दिले असून त्यानुसार सर्व पर्यवेक्षकांनी 4 हजार अंगणवाडीतील शिक्षकांना प्रशिक्षीत केले असून त्यांच्यामार्फत अंगणवाडीतील छोटया छोटया मुलांना प्रशिक्षण देणे चालू केले असून त्यांचा डाटा 30 सप्टेबर 2016 पर्यत करण्यात येईल.
या प्रकल्पामध्ये 3-4, 4-5 व 5-6 या वयोगटातील मुलांचा Data प्राप्त केला जाईल. त्यामध्ये प्रत्येक वयोगटातील मुला/मुलींची उंची, वजन तसेच स्थिर जंप (Broad Jump) व भितींवरील उभी जंप (Jump and Rich ) च्या माध्यमातुन क्षमता पाहण्यात येईल. या मुला/मुलींची क्षमता पालक व शिक्षक याना अवगत करण्यात येईल व जिल्हयातील डाटाच्या प्राप्त माहितीनुसार Talented मुला/मुलींचे वेगळे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन तालुकानिहाय करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पावरती सुरु असलेला Website View पाहता जिहयातील विविध शिक्षण संस्था कडुन सदर प्रशिक्षणाबाबत विचारणा होत असुन त्यांच्यासाठीही प्रशिक्षण शिबीराचे दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी 11 वाजता करण्यात येणार असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांनी सागितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!