
कोल्हापूर: जागतिक स्तरावर विविध विषय आणि दर्जेदार कलाकृती सदर करणारे वायकॉम मोशन पिक्चर्स आपल्या आगामी ‘फोटोकॉपी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.रोमांटिक आणि कॉमेडी

पठडीतला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अशी माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय मौर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.दोन जुळ्या बहिणींची कथा मांडणारा हा चित्रपट फोटोकॉपी या शिर्षकाला साजेसा असाच आहे.पर्ण पेठे ही या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार असून चेतन चिटणीस,वंदना गुप्ते,अंशुमन जोशी यांच्या भूमिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतील.धम्माल मस्ती आणि प्रत्येकाला ठेका धरण्यास भाग पाडणारे ‘पिपाणी’ हे गाणे कॉलेज कट्ट्यांवर जॊरात वाजत आहे. गाणे फोटोकॉपी चे दिग्दर्शक विजय मौर्य आणि ए व्ही प्रफुलचंद्र यांनी शब्दबद्ध केले असून वैशाली सामंत आणि प्रवीण कुंवरचा आवाज लाभलेल्या या गाण्याला म्युजिक देण्याचे,काम देखील ए व्ही प्रफुलचंद्र यांनी केले आहे. तसेच तरुण मनाला फुलवणारे ‘तू जिथे मी तिथे’ या प्रेमगीताला देखील पसंती मिळत आहे. अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निलेश मोहरीर यांचे दिग्दर्शन लाभले असून स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या दोन गोड गळ्यांच्या जोडीने हे गाणे गायले आहे. तसेच ‘ओली ती माती’ हे केतकी माटेगावकर च्या आवाजात सादर झालेले सुमधुर गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करण्यास पुरेसे ठरत आहे. ‘फोटोकॉपी’ या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. चेतन चिटणीस नावाचा गोंडस चेहरा यांमार्फत लोकांसमोर सादर होत आहे.‘फोटोकॉपी’ हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत कधीही न हाताळल्या गेलेल्या पद्धतीने बनवलेला असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.आणि प्रेक्षकांच्या पसंतीस हा नक्की उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.
Leave a Reply