
कोल्हापूर: आज घरगुती गौरी आणि गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले.कोल्हापुरातील रंकाळा,कोटीतीर्थ,राजाराम तलाव,कसबा बावडा,पंचगंगा घाट येथे लहान मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.पण आज बहुसंख्य लोकांचा मूर्तीदान करण्याकडे कल दिसून आला.मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी जनजागृती झाल्याने मूर्तीदान करण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले.पण यात अजून वाढ होण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे गौरी आणि निर्माल्य हे पाण्यात अजिबात टाकायला दिले जात नव्हते.महापालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगळी यंत्रणा सज्ज ठेवली होती.या स्तुत्य उपक्रमाने आज कोल्हापुरात खरोखर पर्यावरणाचे आणि पाण्याचे प्रदूषण काही प्रमाणात थांबविण्यात कोल्हापुरकर यशस्वी झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Leave a Reply