
कोल्हापूर:शिवाजी पेठ येथील १३६ वर्षाची परंपरा लाभलेली कोल्हापुरातील सर्वात जुनी अश्या तटाकडील तालमीने यावर्षीही वेगळेपण जपले आहे.यावर्षी आसाम राज्यातील गुवाहाटी येथील साम्यान्य क्षेत्र कलामंचचे पारंपारिक नृत्य हे यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे.अशी माहिती तटाकडील तालमीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष विश्वदीप साळोखे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.कोल्हापूरहून ३ हजार किलोमीटर अंतरावर भारताच्या पूर्वेकडील आसाम राज्याच्या पारंपारिक नृत्य आणि कला कोल्हापूरच्या जनतेला पाहण्याचा सुयोग येत्या विसर्जन मिरवणुकीत मिळणार आहे.या कलामंचने आजपर्यंत काश्मीरपासून अंदमान पर्यंत भारत सरकारच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली कला सादर केली आहे.कोल्हापुरातही लेवताना डान्स,कोवा डान्स,भोरट डान्स,आदि कलाप्रकार यावेळी सदर केले जाणार आहेत.हे कलाप्रकार सादर करण्यासाठी प्रत्यक्ष वादक आणि कलाकार लवकरच कोल्हापुरात दाखल होणार आहेत.
तटाकडील तालीम मंडळाने नेहमीच आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जपलेला आहे.लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाआधीपासून या तालीम मंडळाला गणेशोत्सवाची परंपरा आहे.आखाडा असणारी आणि कुस्ती परंपरा जपणारी ही एकमेव तालीम आहे. तसेच गणेशमूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनवलेली असून मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर केलेला आहे.मूर्तीसाठी अस्सल सोन्याचे दागिने घडविलेले आहेत.पण काहीअंतर्गत वादामुळे हे दागिने आज मूर्तीच्या अंगावर नाहीत.तरी वाद बाजूला ठेवून किमान गणेशोत्सवदरम्यान हे दागिने परत मिळावे अशी मागणी अत्त्ताच्या संचालक मंडळाने केली आहे.पत्रकार परिषदेस अध्यक्ष महेश जाधव,उपाध्यक्ष हरीश गायकवाड,सचिव राजेंद्र जाधव,खजानीस राहुल पाटील, उत्सव समिती उपाध्यक्ष अमोल चव्हाण,सचिव लक्ष्मण सलकी,खजानीस शुभम लोहार,रविराज भोसले,महेश गुरव,सरदार पाटील,शहाजी शिंदे,जितेंद्र करंबे यांच्यासह मंडळाचे संचालक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply