
कोल्हापुर :उर्वी एन्टरप्रायझेस प्रस्तुत दुहेरी कुटुंबाचे गणित मांडणारा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.आयुष्याच्या खडतर वाटेवर प्रवास करत असताना एका वळणावर पाहिलेली स्वप्नेच दुसऱ्या वळणावर पाहिलेल्या स्वप्नाच्या आड येतात आणि इथून मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चा प्रवास कसा सुरु होतो याचे सुंदर प्रदर्शन या चित्रपटात करण्यात आले आहे.हा प्रवास प्रेक्षकांसमोर आणला आहे दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी.दिनेश अनंत यांचा हा पहिलाच चित्रपट असून कार्पोरेट विवाहित दांपत्याच्या जीवनातील प्रसंग साध्या,सोप्या,आणि सरळ भाषेत मांडणारा पण गंभीर विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे असे दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी सांगितले.अवघ्या दोन पात्रांसाभोवती फिरणारे चित्रपटाचे कथानक हेच याचे वैशिष्ट्य आहे.कथा प्रकाश गावडे यांनी लिहली असून पटकथा आणि संवाद प्रकाश गावडे आणि दिनेश अनंत यांनी लिहलेले आहेत.या चित्रपटात स्मिता गोंदकर आणि क्राईम पॅट्रोल फेम राजेंद्र शिसतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत हा वेगळा प्रयोग निर्माते मितांग रावळ यांनी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणला असून येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चित्रपटाच्या टिमने व्यक्त केला.
Leave a Reply