
कोल्हापूर: मराठीत प्रथमच काही भाग वगळता संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण झालेला चित्रपट अ डॉट कॉम मॉम येत्या ३० सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर पुढील महिन्यात अमरिकेतील मराठी भाषिक लोकांसाठी प्रदर्शित होत आहे.मुलांसाठी निस्वार्थ मनाने झटणाऱ्या आईचे मन आणि प्रेम जी आई आपल्या मुलासाठी तडजोडी करत असते.अश्या भोळ्या आईची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.नाट्यसृष्टीत आपला नेहमीच ठसा उमटवलेल्या डॉ.मीना नेरुरकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे.आपल्या मुलाच्या आग्रहाखातर अमेरिकेत गेलेल्या आईची तारांबळ विनोदी पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे.एकीकडे मॉडर्न सून तर दुसरीकडे आपला मुलगा यांच्या अपेक्षांचे ओझ पाठीवर घेऊन ही आई वेगवेगळे कर्तब करताना आपल्याला दिसेल.यात आईची भूमिका स्वतः डॉ.मीना नेरुरकर यांनी केलेली आहे.तर मुलाची भूमिका हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व परिचित आघाडीचा नायक साई गोंडेवार याने समर्थपणे साकारलेली आहे.कायान प्रोडक्शन या बॅनरखाली चित्रपटची निर्मिती असून भारतीय आईचा अमेरिकन मॉम पर्यंतचा प्रवास यात दाखवला गेलाय.चित्रपटात एकूण 3 गाणी असून जगदीश खेबुडकर यांनी ती लिहिली आहेत.अशोक पत्की एन.दत्ता नील नाडकर्णी,प्रतिक शहा यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं आहे.देवकी पंडित,नील नाडकर्णी,निदा,निलीजा,अंकुर्म यांच्या सुमधुर आवाजाने त्यांना साज चढविला आहे.वेगळा विषय,दमदार कथानक आणि मनोरंजन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास डॉ.मीना नेरुरकर यांनी व्यक्त केला.मराठी चित्रपटाची उंची आता वाढली आहे.एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे.पहिलाच माझा मराठी चित्रपट करताना मला खूप आनंद होतोय अशी भावना साई गोंडेवार याने व्यक्त केली.
Leave a Reply